आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:शाळेतून प्रथम क्रमांक यशोदा आनंता कदम; सोनपेठच्या शास्त्री विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के

सोनपेठ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये तालुक्यातील मौजे लासीना येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाने यश प्राप्त केले असून निकाल १०० टक्के लागला आहे बळीराजा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत तालुक्यातील लासिना येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील एकूण ३३ विद्यार्थी परिक्षेस बसले होते.

या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक यशोदा आनंता कदम हिने मिळवला. यासह द्वितीय क्रमांक यशोदा अशोक हाके व तृतीय क्रमांक वैष्णवी बालासाहेब कोचे हिने प्राप्त केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्थानिक मंडाळाचे अध्यक्ष पंडितराव कदम, भागवत परांडे, शिवाजी कदम, मधुकर कोचे, विनायक कदम, उमाकांत कदम, आनंता कदम, मुख्यध्यापक अंकुश परांडे, भगवान पैठने, मुंजाजी डुकरे, सुग्रीव दाढेल, प्रकाश सोळंके, सुभाष मकने, दत्ता परतवाड, प्रमोद मोरेंनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...