आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:योगासन व प्राणायम आरोग्यासाठी अत्यावश्यक; सत्र न्यायाधीश हेमंत महाजन योग शिबिरात प्रतिपादन

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनात संतुलित व निरोगी शरीर हे सर्वात अमुल्य आहे. त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या योगासन व प्राणायमावर प्रत्येकाने भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत श.महाजन यांनी केले. बीड येथे श्री कंकालेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी (ता.२१ जून) सकाळी ठीक ६ वाजता किमान समान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक कॉलेज बीड, काकु-नाना प्रतिष्ठाण, जिल्हा विधीज्ञ संघ बीड व पंतजली योग समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाजन बोलत होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव सिध्दार्थ ना. गोडबोले यांच्यासह अॅड.श्रीराम लाखे, योगेश क्षीरसागर, अॅड.शहादेव नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कंकालेश्वर मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत शब्दसुमनांनी करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महाजन यांनी योगासने व प्राणायम करणे आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किती आवश्यक आहे, याबाबत माहिती दिली. त्यानंतर अॅड. श्रीराम लाखे यांनी उपस्थितांना आयुषमंत्रालय दिल्ली यांचे कडुन निर्देशित शिष्टाचारानुसार योगासन, प्राणायम प्रात्यक्षिक करून दाखविले. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशुन केलेल्या संबोधनाचे प्रक्षेपणही याठिकाणी पार पडले.

बीडच्या योग शिबिरात ४०० जणांचा सहभाग
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य योगा फॉर ह्युमॅनिटी (मानवतेसाठी योग) असे असून प्रत्येकाने योग करून शांत व संतुलित जीवन जगावे, असे आवाहन लाखे यांनी केले. या शिबिरात ४०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला तर राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाक, ॲड. श्रीराम लाखे, विलास घेाडके, डॉ.चंद्रकांत माने, पुरुषेात्तम एरंडे, बाबासाहेब कुडके आदींनी पुढाकार घेतला.