आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:युवकांनो तंबाखूला नाही म्हणा, बीड शहरात जनजागृती प्रभात फेरी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरांमधील जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व शासकीय निमशासकीय आणि खासगी सर्व संस्थांमध्ये उपस्थितांना तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांना तंबाखूविरोधी शपथ देण्यात आली. रॅलीदरम्यान तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीची माहितीपत्रके वाटप करण्यात आली.

३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त डॉक्टर सुरेश साबळे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरांमधील जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय तंबाखू नियंत्रण कक्ष बीड, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान वासनवाडी ता जि बीड ,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली.

यावेळी तत्वशिल कांबळे जिल्हा संघटक बीड नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य क्षीरसागर उपप्राचार्य शासकीय नर्सिंग कॉलेज मोहिते, महानोर, पवार, साळव, ससाने, डॉ. अशोक मते, एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वयक अंबादास जाधव, संतोष हमानरे, रेड्डी, यादव, अभिनय सरोदे व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...