आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळ असलेल्या तळेगाव शिवारात एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसंात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत बंडू अरुण कांबळे (३६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बीड शहराजवळील तळेगाव शिवारात असलेल्या महाकुळे वस्तीवर वास्तव्यास होते.

बुधवारी रात्री त्यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देविदास आवारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...