आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:'आय मिस यू, माय लव्ह, माय जिगरी', असे स्टेटस ठेवत धुलिवंदनाच्या दिवशीच तरुणाने घेतला गळफास

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना गेवराई तालुक्यातील आगरनांदूर येथील युवकाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ मार्च रोजी गेवराई तालुक्यातील आगरनांदूर येथे घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

नितीन चिमाजी निर्मळ (२३) असे मृताचे नाव आहे. आगर नांदूर येथील नितीन हा धूलिवंदनाच्या दिवशी गावात होता. मात्र त्याच्या काही मित्रांनी त्याचे सोशल मीडियावरील स्टेटस पाहिले असता त्याने आपल्या सोशल मीडियावर ‘आय मिस यू, माय लव्ह मिस यू फ्रेंड, बाय, माय जिगरी, सॉरी शेवट’, अशा प्रकारचे स्टेटस ठेवले होते. नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळील गायरानातील झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...