आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:योग साधनेत रमले जिल्हाभरातील युवक, विद्यार्थी, नागरिक; ठिकठिकाणी शिबिरे घेत प्रात्यक्षिकांतून माहिती, मार्गदर्शन

बीड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मंगळवारी (ता.२१ जून) जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांत योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यासह योगाभ्यासाचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शनही केले. व्यक्तीगत स्तरावर योगदिन हा एक दिवसापुरता न राहता नियमित व्हावा, असे आवाहन योग प्रशिक्षकांनी नागरिकांनी केले. धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनिमोहा येथे जागतिक योग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. शिक्षक रखमाजी निर्मळ यांनी विद्यार्थ्यांना योग आसनांची माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक मकरध्वज आंधळे, सोमनाथ स्वामी, शेषनारायण घोळवे, अंकुश जगदेव, कल्पना साळवे, विजय राठोड, नामदेव साठे, राजेभाऊ तोंडे आदींची उपस्थिती होती.

केएसपी विद्यालय, बीड
शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालयात संस्था अध्यक्ष अंजली शेळके, गटशिक्षणाधिकारी ऋषीकेश शेळके शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक विश्वनाथ गडकर यांनी सर्व विद्यार्थी व सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी योगा, ध्यान, प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले.
राजर्षी शाहू कन्या विद्यालय
श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ बीड संचलित, राजर्षी शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तेलगाव रोड बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका एस.डी. कदम व एम.एच.आगलावे, एम.एस.सोनवणे यांनी विद्यार्थिनींना योगाचे महत्व सांगून कवायती, प्राणायाम, योग, सूर्यनमस्कारसह प्राणायामाचे महत्व प्रात्यक्षिकांसह विशद केले. कपालभाती, अनुलोम, विलोम, भस्त्रिका, भ्रामरी, उदगीत, उज्जई, अग्निसार आदींचा योगमुद्रांबाबत माहिती देण्यात आली.

केएसके कृषी महाविद्यालय
बीड शहरातील केएसके अन्नतंत्र आणि कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री अनंत कृषि विकास प्रतिष्ठाण संस्थेचे सहसचिव डॉ.जी.व्ही.साळुंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. पुढे त्यांनी सर्वांना योगासनाचे महत्व पटवून सांगितले. ते म्हणाले की, कोरोना सारखी वैश्विक महामारी चालू असताना योगासनाचे अनन्य साधारण महत्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती आणि आत्मिक शांतता चांगली ठेवायची असल्यास योगासन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. योग गुरु प्रा.बी.बी.तांबोळकर आणि प्रा.प्रतिभा आरसुळ यांनी वेगवेगळया पध्दतीचे योगासने आणि त्यांचे विविध आजारावर होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.झेड.एच.सय्यद, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.मोरे आणि सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वा.सावरकर विद्यालय
बीड शहरातील स्वा.सावरकर प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १६ ते २१ जून यादरम्यान हे योग शिबिर पार पडले. शिबिराच्या समारोपाच्या औचित्याने भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी उमेश जगताप, मुख्याध्यापक सुरेश अन्नदाते, पतंजली योग समिती योग प्रशिक्षक नामदेव एकशिंगे, संजीवनी चाटोरीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमे पूजन करून योग प्रात्यक्षिक सुरुवात करण्यात आली. या योग शिबिरास स्वा.सावरकर विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पर्यवेक्षक संख्येने उपस्थित होते.

योगसाधनेमुळे तन-मन सुंदर, संतुलित राहते
योगाभ्यास आणि त्याचे जीवनशैलीवर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर योग दिन साजरा केला जातो. योग साधनेमुळे तन-मन सुंदर व संतुलित राहते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. अंबाजोगाई कृषि महाविद्यालयात ‘योगापार्क’ येथे योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ..सुहास जाधव, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश वाघमारे, डॉ.विद्या तायडे, डॉ.अजित पुरी, मन्मथ बेरकीले, धीरज पाथरीकर, श्री प्रमोद कळसकर, श्री बालासाहेब चिल्लरगे, श्री बालासाहेब वारकरी, अनिल खेडेकर, राजेश रेवले, प्रकाश मुजमुले, नंदकिशोर मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी उमेश जायभाये, बेलाजी गेंदाफळे, यशवंती वीर, पुजा सिरसाठ, वैष्णवी पाटील, प्रतिक्षा कासले आदींनी परिश्रम घेतले.

सहजयोग युवा शक्ती
बीड जिल्हा सहजयोग परिवार युवा शक्तीच्या वतीने बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात योग दिनानिमित्त सहजयोग साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर गेवराई तालुक्यातील धारवंटा येथे जिल्हा परिषद शाळेत योग दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळपास ९० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच उपस्थित प्राध्यापक, ९० विद्यार्थी यांना कुंडलिनी जागृती अनुभूती घेतली. यावेळी युवा शक्ती समन्वयक ज्योती सूर्यवंशी, डॉ.आरती काकडे, युवा शक्ती समन्वयक सचिन शेळके, रवि वाघमारे, सुमित वंजारे यांची उपस्थिती होती.

टाकरवण विद्यालय
माजलगाव तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग्य दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. माध्यमिक विद्यालय टाकरवन येथे राष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यालयात विविध प्रकारच्या योग साधना करण्यात आल्या. योगगुरू बी.एन. मोरे यांनी योगाचे प्रकार व त्याचे मानवाच्या जीवनात आरोग्यदायी महत्त्व विशद करताना सांगितले की व्यक्ती जीवनात आनंदी जगायचं असेल. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, मन नेहमी प्रसन्न राहावे, त्यासाठी प्रत्येकाने सकाळी लवकर उठून योग्य व्यायाम करावा, असे आवाहन केले. संस्थेचे सचिव प्रताप रांजवन, मुख्याध्यापक एस.टी.शिंदे, पर्यवेक्षक मुंढे आदी हजर होते.

योगेश्वरी प्रा. विद्यालय
अंबाजोगाई शहरातील कै.दे.बा.ग. योगेश्वरी नूतन विद्यालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभू बागल यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर, सत्र प्रमुख हनुमंत इंगळेवाड, शिक्षक प्रतिनिधी अनंत जोशी यांचीही उपस्थिती होती. प्रभू बागल यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगासने करून दाखवली. तसेच त्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण राऊतमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप घाटे, अमोल जाधव, प्राजक्ता गोस्वामी, स्नेहा बर्दापूरे, अश्विनी खरबड, रूपाली पुसकर, विद्या देशमुख, पवन पाटील, अनिल बडे यांनी परिश्रम घेतले.

योगेश्वरी प्रा. विद्यालय
अंबाजोगाई शहरातील कै.दे.बा.ग. योगेश्वरी नूतन विद्यालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभू बागल यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर, सत्र प्रमुख हनुमंत इंगळेवाड, शिक्षक प्रतिनिधी अनंत जोशी यांचीही उपस्थिती होती. प्रभू बागल यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगासने करून दाखवली. तसेच त्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण राऊतमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप घाटे, अमोल जाधव, प्राजक्ता गोस्वामी, स्नेहा बर्दापूरे, अश्विनी खरबड, रूपाली पुसकर, विद्या देशमुख, पवन पाटील, अनिल बडे यांनी परिश्रम घेतले.

केएसके महाविद्यालय
शहरातील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक योगदिन सकाळी ५:४५ ते ७:१५ यावेळेत योग शिक्षक प्रा.राजेंद्र गाडेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांनी आरोग्यासाठी योग करणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मजबूत करण्यावर स्वयंसेवकांनी लक्ष देणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले. प्रा.गाडेकर यांनी योग प्रशिक्षण दिले.

योगाभ्यास दैनंदिन जीवनातही आवश्यक : प्राचार्य एस.ए.डाके
बीड येथील सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनी योग मार्गदर्शन शिबिर पार पडले. योगाभ्यास दैनंदिन जीवनातही अत्यावश्यक असल्याचे सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस.ए. डाके यांनी सांगितले. यावेळी मिलिंद शिवणीकर, शिवाजी पवार, बाबासाहेब क्षीरसागर, देविदास धनगर, श्रीमंत राठोड, सेना पदक विजेते मेघराज कोल्हे, शिक्षण निदेशक फुलचंद गायकवाड, विजयकुमार धारणकर आदींची उपस्थिती होती.

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव
माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात आठवा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक मिलिंद वेडे हजर होते तर योगाचे प्रात्यक्षिके पर्यवेक्षक रवींद्र खोडवे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश रोकडे यांनी केले. आभार शिवशंकर भंडारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग शिबिरात न्यायाधीश, वकिलांनी घेतला सहभाग
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथील राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. एच. एस. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योगाला सुरुवात झाली. पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी प्रा. राजेंद्र बरकसे यांनी योग आणि प्राणायाम शिकवताना मार्गदर्शनही केले. यावेळी नागरिकांचीही मोठ्या संख्येने हजेरी होती.

नेहरू युवा केंद्राच्या शिबिरात युवकांचा सहभाग
बीड येथील नेहरू युवा केंद्र व राजर्षि छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती विद्यालय, बीड या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध योग प्रकार शिकवण्यात आले. डॉ.दत्ता नलावडे, नाना पाटील, तत्त्वशिल कांबळे, ओमप्रकाश गिरी, ज्योतिराम घुले, बाजीराव ढाकणे, अलंकार सरवदे, अभिनय सरवदे यांची उपस्थिती होती. आपले शरीर मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा खूप गरजेचा आहे. जर दररोज एक तास योगा केला तर माणूस निरोगी राहतो. त्यामुळे प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे आहे , असे आवाहन यावेळी डॉ.दत्ता नलावडे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई
अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगगुरू अॅड. वैजनाथ पांडे यांनी विविध प्रकारचे आसने करुन दाखवली. योग, प्राणायाम याचे मानवी जीवनातील महत्त्व त्यांनी विषद केले. यासह त्यांनी विद्यार्थ्यांकडून व महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विविध आसने प्रात्यक्षिक सादर करत करून घेतली. प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

योग प्रात्यक्षिकांत वकील, नागरिक, विद्यार्थी सहभागी
गेवराई येथे तालुका विधि सेवा समितीच्या वतीने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. एच.एस.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योगाला सुरुवात झाली. पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी, योग प्रशिक्षक प्रा. राजेंद्र बरकसे यांनी योग आणि प्राणायाम शिकवताना त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...