आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशयसमृद्ध लेखन करणारे रेवकी (ता. गेवराई,जि.बीड) येथील संतोष विठ्ठल घसिंग यांच्या //"झामणझरा कादंबरीला बडोदा वाड:मय परिषदेचा सर्वोत्कृष्ट प्रथम कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संतोष घसिंग यांच्या या अगोदरच्या जवळपास सर्वच प्रकाशित कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह यांना राज्य पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून प्रतिमा युक्त शैलीमुळे त्यांच्या साहित्याची दखल अनेक ज्येष्ठ समीक्षकांनी घेतलेली आहे. घसिंग हे सध्या कृषि अधिकारी पदावर कार्यरत असून त्यांच्या पहिल्याच //"माती उन्हाचे चंद्र //" या कविता संग्रहाला राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यानंतरचा'' ''पालाणचिरा'' हा कवितासंग्रह'' विधाराद्रोण ''कादंबरी ''काजळकुकू'' ही ग्रामीण कादंबरी अनेक राज्य पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या असून ''झामणझरा'' ह्या कादंबरीने राष्ट्रीय पातळीवर या निमित्ताने मोहोर उमटवली आहे. या पुरस्काराचे वितरण २६ मार्च रोजी बडोदा येथे समारंभपूर्वक होणार आहे. याबद्दल घसिंग यांचे अभिनंदन होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.