आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:जिल्हा परिषदेने केली एक हजार ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या वतीने निराधार वृद्धांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘थोडेसे मायबापासाठी’ या उपक्रमातून गुरुवारी जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. एकूण १ हजार ३५ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी यातून केल गेली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याबाबत माहिती दिली.

औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून व सीईओ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात थोडेसे मायबापासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या नेतृत्वात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सर्वेक्षण करुन १ हजार ३५ निराधार वृद्ध शोधण्यात आले आहेत. त्यांना ओळखपत्र दिले गेले आहे. गुरुवारी गणेशोत्सवाचे निमित्त साधून या वृद्धांची प्राथमिक आरेाग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांनी याचे नियोजन केले होते. एसीइओ सोळंके यांनी बीड तालुक्यातील नाळवंडी आणि वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत पहाणी केली. , गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका आरोग्य अधिकारी नरेश कासट, वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा तरकसे, सोनाली सानप यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

तूच माझा मुलगा..
वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राधाबाई शिंदे (रा. ढोरवाडी) या महिलेला तपासणीसाठी ग्रामसेवकांनी स्वत:च्या कारमधून आणले. या वेळी एसीईओंच्या उपस्थितीत त्यांची तपासणी झाली. शिंदेंना मूलबाळ नाही, मात्र तुम्ही मुलाप्रमाणे काळजी घेत आहात. तूच माझा मुलगा आहेस, असे म्हणत त्यांनी आशीर्वाद दिले.

बातम्या आणखी आहेत...