आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी शाळा:शिक्षकांसाठी वानगावातील विद्यार्थ्यांची झेडपीत शाळा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वानगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडून आंदोलन केले. शाळेवर दोन शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक सातत्याने गैरहजर असतात. शिक्षकांची संख्या वाढवावी आणि गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. वानगावच्या जिल्हा परिषद शाळेत सध्या१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेवर केवळ दोन शिक्षकांची नियुक्ती आहेत.

यातील एक शिक्षक हे सातत्याने गैरहजर राहत असल्याने १०० विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांची संख्या वाढवावी आणि गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर कारवाई करावी, यासाठी गुरुवारी पालकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेत शाळा भरवून आंदोलन केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आंदोलक पालकांशी चर्चा केली. शिक्षकावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले गेले.

बातम्या आणखी आहेत...