आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्पर:विद्यार्थ्याच्या खात्यावरून एक लाख परस्पर काढले

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलवर आलेली लिंक उघडून आलेला ओटीपी टाकल्याने बँक खात्यातून सव्वा लाख रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी उस्मानपूर येथील विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान ज्ञानेश्वर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० नोव्हेंबर रोजी पॅन कार्ड बँक खात्याला अपडेट करण्यासाठी मोबाइलवर मॕेसेज आला आणि त्या मॕेसेजमध्ये एक लिंक आली. लिंकवर गेल्यावर आधार व पॅन नंबर टाकल्यानंतर मोबाइल नंबरवर एक ओटीपी आला. तो ओटीपी टाकला असता ९९ हजार ९९९ रुपये खात्यातून कपात झाले. त्यानंतर २४ हजार ९९९ रुपये ट्रान्सफर झालेला मेसेज आला. त्यावरून १ लाख २४ हजार ९९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोपान राऊत यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एम.बी. खेडकर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...