आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब ऑफ जालनाच्या वतीने येथील फुलंब्रीकर नाट्यगृहाजवळील एम. एस. जैन इंग्लिश स्कूलमधील १८०० विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिराला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सातशे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती क्लबच्या अध्यक्ष स्मिता चेचाणी यांनी दिली.
डॉ. रश्मी अग्रवाल आणि त्यांच्या टीमच्या डॉ. गौरी राका, डॉ. कृष्णा भक्कड, डॉ. दीपाली वराडे, डॉ. आरती बोबडे, औरंगाबादच्या डॉ. तृप्ती राठोड यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. चेचाणी म्हणाल्या, शालेय जीवनातच दंतविकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास दंतविकार बळावत जातो. ही बाब विचारात घेता क्लबने जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर हा प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्वीच्या तुलनेत दंतविकारांचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट ते तिप्पट आढळून येत आहे. योग्य वेळी निदान व्हावे हा प्रकल्प राबवण्यामागील उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला क्लबच्या सचिव स्वाती कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख सुनीता अग्रवाल, प्राचार्य मांडलिया, प्राचार्य सारडा यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.