आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार शक्तिप्रदर्शन:दसरा मेळाव्यासाठी 10 हजार शिवसैनिक मुंबईला रवाना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जालना जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक मंगळवारी मुंबईकडे रवाना झाले. जवळपास ८०० वाहनांतून दहा हजारांहून अधिक शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा माजी मंत्री तथा उपनेते अर्जुन खोतकर यांनी केला आहे.खोतकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिंदे गटाने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे कूच केले.

जालना शहरातून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी अर्जुन खोतकर, भाऊसाहेब घुगे,पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर हेही सहभागी झाले होते. नंतर समृद्धी महामार्गाने ही सर्व वाहने मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, दौलताबादजवळ या ताफ्यातील तीन ते चार वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात झाला. मात्र यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.जिल्ह्यातून ७५ बसेस : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ७५ बस जाणार आहेत. या बस कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी बुक केल्या आहेत. मंगळवारी दुपारपासून बसेस भोकरदन मार्गे सिल्लोडकडे रवाना झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...