आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरातील आवक‎:हरभरा हमीभाव केंद्र सुरू नसल्याने क्विंटलमागे हजाराचा फटका‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याची‎ आवक आता सुरू झाली आहे. शनिवारी‎ बाजारपेठेत तब्बल १५७ क्विंटल हरभरा दाखल‎ झाला. एकीकडे शासनाने ५५०० रुपये हमीभाव‎ जाहीर केला असताना शनिवारी सरासरी ४४०० दर‎ मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे‎ जवळपास एक हजाराचा फटका बसत आहे.‎दुसरीकडे नाफेडने हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी‎कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. १‎फेब्रुवारी रोजी तब्बल १९६ क्विंटल हरभरा बाजारात‎ आला होता. शनिवारी १५७ क्विंटल हरभऱ्याची‎ आवक झाली.‎ कमाल भाव मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य‎ असून सरासरी ३५०० ते ४२०० रुपयांपर्यंतच दर‎ शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे. सरकारने ठरवून‎ दिलेल्या हमीभावाच्या तुलनेत सध्या कवडीमोल‎ दराने हरभरा विकला जात असल्याने शेतकरी‎ हवालदिल झाला आहे.‎

ऐनवेळी उडणार गोंधळ‎ गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र‎ दुपटीने वाढले आहे. त्यातच आता पीकपेरा‎ ऑनलाइन करण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना‎ केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला पेरा‎ ऑनलाइन केलेला नाही. त्यामुळे नाफेड जेव्हा‎ खरेदी केंद्र सुरू करेल, तेव्हा एकूण क्षेत्राच्या २५‎ टक्के क्षेत्राची सरासरी उत्पादकता लक्षात घेऊन‎ लक्ष्यांक ठरवला जाईल. त्यामुळे ऐनवेळी‎ गोंधळ उडू शकतो.

उद्दिष्ट वाढवून द्यावे‎ गतवर्षी नाफेडने अचानक पोर्टल बंद केल्यामुळे‎ आमच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या ४२४‎ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करता आला नव्हता.‎ आताही शासनाने हे खरेदी केंद्र लवकर सुरू‎ करावे. या वर्षी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत‎ दुप्पट क्षेत्रावर हरभरा पेरणी वाढली आहे.‎ त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देणे आवश्यक आहे.‎ -भगवानराव डोंगरे, चेअरमन,आयडियल‎ अॅग्रोटेक‎

बातम्या आणखी आहेत...