आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीडीसी प्रकरणात १०३ जणांसह अनेकांनी पैसे गुंतवले आहेत. पैशाचा कसा व्यवहार केला, कशी रक्कम भरली, कोणत्या खात्यात रक्कम भरली याबाबतचा सर्व अहवाल तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला आहे. जीडीसी प्रकरणात फसवणूक झाली म्हणून प्रमोटर किरण खरात, पत्नी दीप्ती खरात यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर गुंतवलेली रक्कम वसूल करण्यासाठी पुणे येथून अपहरण करून औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये व जालन्यात डांबून ठेवल्याची तक्रार किरण खरात यांनी दिली होती.
यावरून विजय झोल, गजानन तौर, विक्रम झोल, सुभाष काकस, अनिरुद्ध शेळके, विजय भांदरगे, सुमीत जाधव यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आठही जणांना कोर्टाकडून अटकपूर्वी जामीन मिळाला आहे. किरण खरात यांच्यावरही गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. आभासी चलन असलेल्या या व्यवहारात अजून अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. १०३ प्रकरणांमध्ये आतापर्यंत जवळपास तीन कोटींची गुंतवणूक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.