आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी तसेच बारावीच्या परीक्षेला कॉपी करू न दिल्याने नागरिकांनी थेट शिक्षकांना शिवीगाळ करून शाळेवर दगडफेक केल्याचा प्रकार ८ मार्च रोजी जिप शाळा शेवली या केंद्रावर घडला. शिवाय पुढील पेपरला कॉपी कशी करू देत नाही अशा धमक्या शिक्षकांना मिळाल्याने केंद्र प्रमुखांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकाराबद्दल तक्रार केली. याची दखल घेत या परीक्षा केंद्रावर ८ पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. शिवाय भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात असून यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनात दहावी तसेच बारावीच्या परीक्षा होत आहे.
यावर्षी तब्बल १७ पथके तैनात करण्यात आली आहे. असे असताना ८ मार्च राेजी जिल्हा परिषद शाळा सेवली येथील केद्रावर बाहेरून चिठ्या पुरवण्याच्या प्रकाराला विरोध करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून धमक्या देण्याचा प्रकार घडला. शिवाय शाळेवरही दगडफेक झाल्याने केंद्रप्रमुख, केंद्र संचालक तसेच उपकेंद्र संचालकांनी हा प्रकार थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. यावर अॅक्शन घेत भरारी पथकाच्या भेटी तसेच आठ पोलिसांचा पहारा देण्याच्या सूचना करण्यात आल्या. या परीक्षा केंद्रावर ५५४ विद्यार्थी परीक्षा देत असून दहावीसाठी ३८८ तर बारावीसाठी १६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
पोलिसांची करडी नजर ८ मार्च रोजीचा प्रकार लक्षात घेता सेवली परीक्षा केंद्रावर पुढील पेपरसाठी आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या शिवारात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. - नित्यानंद उबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.