आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्या देठे यांचा पाठपुरावा:व्यायामाचे 14 प्रकारचे साहित्य; 9 हजार महिला, पुरुषांना होणार लाभ

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून जालना शहरातील मधुबन कॉलनीत महिला, मुलींसह पुरुषांसाठी खुली व्यायामशाळा तयार केली आहे. येथे येणाऱ्या महिला, मुलींना पोलिस प्रशासनातील एक महिला व्यायामाचे धडे देणार आहेत. रविवारी उपसभापती भास्कर दानवे यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले आहे. या व्यायामशाळेचा कॉलनीतील ९ हजार ५०० महिला, पुरुषांना लाभ होणार आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून शहरातील मधुबन कॉलनीत महिला, मुलींसह तरुणांसाठी जालन्यात पहिल्यांदाच व्यायामशाळा बनवण्यात आली. यासाठी माजी नगरसेविका संध्या संजय देठे यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, रविवारी या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी भास्कर दानवे, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, गटनेते अशोक पांगारकर, सिध्दिविनायक मुळे, आर. आर. खडके, ब्रह्मानंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जालना शहरातही विकास होण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला आहे. विविध प्रभागांमध्ये पुरुषांसाठी व्यायाम करण्यासाठी मोकळ्या जागेत व्यायामशाळा तयार करण्यात येणार आहेत. दरम्यान, मोकळ्या जागेनुसार प्रभागांमध्ये हे साहित्य लावून देण्यासह या ठिकाणी वॉल कंपाउंडही केले आहे.

रविवारी झाले उद्घाटन
नगरपालिकेच्या व्यायामशाळेचे रविवारी उद्घाटन झाले झाले. धावणे, रक्तपुरवठा वाढणे, सूर्यमस्कार यासह विविध व्यायामासाठीचे १४ प्रकारचे साहित्य या ठिकाणी लागलेले आहे. ५ हजार पुरुष तर साडेचार हजार महिलांना याचा लाभ होणार आहे.

निधी उपलब्धतेने मदत
महिला, मुलींसाठी स्वतंत्र व्यायामशाळा होण्यासाठी पाठपुरावा केला. पालिका प्रशासनाने यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
- संध्या संजय देठे, माजी नगरसेविका.

बातम्या आणखी आहेत...