आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभाग:1400 मीटर रस्त्याचे काम ठप्प ; वर्षभरापासून रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन विभागाच्या परवानगीअभावी मागील तीन वर्षांपासून जालना शहरातील कन्हैयानगरजवळ १४०० मीटरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. मराठवाडा, विदर्भात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बांधकाम, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. परंतू, याला आठवडा उलटूनही हे काम झाले नाही. जालना शहराला रिंगरोड असणाऱ्या बायपास मार्गाचे सिमेंटीकरण करण्याचे काम सुरु आहे. परंतू, कन्हैयानगर परिसरातील १४०० मीटर परिसरात वन विभागाची परवानगी नसल्यामुळे काम गेल्या तीन वर्षभरापासून रखडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...