आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत की आजादी का अमृत महोत्सवनिमित्त महाआवास अभियान ग्रामीणअंतर्गत बदनापूर तालुक्यातील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या १०१ लाभार्थींच्या खात्यावर घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी १५ हजार प्रमाणे अग्रिम रक्कम १५ लाख १५ हजार रुपये थेट लाभार्थी बँक खात्यावर पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी २३ जून रोजी वर्ग केल्याने रमाई लाभार्थींमध्ये समाधान व्यक्त केले जात असून गटविकास अधिकाऱ्यांनी थेट लाभार्थी खात्यावर रक्कम वर्ग केल्याने घरकुल कामास प्रारंभ होणार आहे. स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या मेळाव्यासाठी ग्रामीण भागातून लाभार्थींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत मागील वर्षी एकूण १६४५ लाभार्थींना उद्दिष्ट पूर्ण करून दिले असल्याचे सांगून त्यापैकी १०३१ लाभार्थींची नोंदणी पूर्ण होऊन ६८९ लाभार्थींना ऑनलाइन मंजुरी मिळालेली आहे.
त्यातील २२० लाभार्थींना अग्रीम रक्कम वितरीत करण्यात आलेली असून जलशक्ती अभियानासंदर्भात जनजागृती करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, गावातील १०० टक्के गावांना शोषखड्डे तयार करणे यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रमाई आवास ग्रामीण योजनेतंर्गत बदनापूर तालुक्यातून मोठया प्रमाणात लाभार्थींना लाभ् मिळावा म्हणून पंचायत समितीमार्फत मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यामुळे मोठया संख्येने लाभार्थी मिळाले त्यांचे ऑनलाइन करून तत्काळ त्यांना निधी वितरीत करण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रयत्न करण्यात येत होते. त्याचेच फलीत म्हणून १०१ लाभार्थींना १५ लाख १५ हजार रूपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला. या निधीचे वितरीण आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण विकासासाठी पक्के घरे असावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी विविध मार्गाने आपण निधी उपलब्ध करून घेतो. पंचायत समितीच्या अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रमाइ आवास योजनेतून भरीव निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचा पहिलाच हप्ता १५ लाखाचा वितरीत करण्यात आल्याचे आमदार कुचे यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अनिल कोलते, वसंतराव जगताप, जगन बारगाजे, हरिश्चंद्र शिंदे, नामदेव तिडके, पद्माकर जऱ्हाड, विलास जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, संतोष पवार, बाबासाहेब कर्हाळे, राजेंद्र तापडिया, नानासाहेब ननावरे, तात्यासाहेब मात्रे, गजानन काटकर, भगवान बारगाजे, भगवान मात्रे, गणेश कोल्हे, सहदेव अंभोरे, लिंबाजी अडसूळ, सुप्पडसिंग जगरवाल, उद्धव काळे, उपअभियंता राजहंस, देशमुख, सुरेश लहाने, आसिफ पटेल, हकीम पटेल, बंडू जगताप, बाबाजी बहुरे उपस्थित होते.
कामे सुरू करावीत
बदनापूर तालुक्यातील मागील वर्षी रमाई योजनेअंतर्गत १६४५ लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आले होते. २३ जून रोजी १०१ लाभार्थींना अग्रीम रक्कम प्रत्येकी १५ हजार प्रमाणे १५ लाख १५ हजार पी एफ एम एस द्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
ज्योती राठोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बदनापूर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.