आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज दाखल:भोकरदन तालुक्यातील 32 सरपंचपदांसाठी 155, तर सदस्यपदासाठी 701 अर्ज दाखल

भेाकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज देण्याची प्रक्रिया किचकट ठरत असल्याने सर्वसामान्य उमेदवारांची मोठी गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने अर्ज ऑफलाईन पध्दतीनेही स्विकारण्यात आले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरूच होती. भोकरदन तालुक्यातील ३२ सरपंच पदासाठी १५५ तर सदस्य होण्यासाठी तब्बल ७०१ अर्ज आले.

ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावपातळीवर तापले असून, २८ नोव्हेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अखेर अर्ज प्रक्रीयेला ब्रेक मिळाले या दिवशी दोन्ही पदासाठी ८५६ अर्ज आले. दरम्यान नामांकन अर्ज स्विकारण्याला शेवटचे १ दिवस शिल्लक असताना शासनाकडून गुरुवारी ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. भोकरदन तालुक्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालाधीत मुदत संपणाऱ्या ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. १८ नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून, २८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याला संधी दिली.

५ डिसेंबर रोजीर अर्जांची छाननी होणार आहे. या मध्ये तब्बल ३२ सरपंच पदासाठी १५५ तर सदस्य होण्यासाठी तब्बल ७०१ अर्ज आले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अर्ज भरण्याची लगबग सुरू होती. शिवाय कागदपत्रांची जुळवा जुळव करून उमेदवारांची मोठी दमछाक झाली. अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिल्याने तहसील कार्यालयात इच्छुकांची धामधूम पहावयास मिळाली आहे. यंदा सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने अनेकांनी आतापासूनच डोक्याला बाशिंग बांधलेले दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी गावागावांत विशेष घडामोडी पहावयास मिळणार आहेत.

बुधवारी लढतीचे चित्र स्पष्ट होणार : गावागावातील स्थानिक नेते, राजकीय पदाधिकाऱ्यासह इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने पारंपारिक पध्दतीने ऑफलाईनही अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले तसेच अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल रात्री ९ वाजले. शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी मोठा गर्दी केली होती. सोमवारी निवडणूक विभागाकडून प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे तर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे निवडणूक लढतीचे चित्र बुधवारीच स्पष्ट होणार आहे. यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेतून आता सरपंच तसेच सदस्य पदाच्या उमेदवारांची होणाऱ्या दमछाक ला ब्रेक मिळाला.

या गावांत बिनविरोध निवडणुकीची परंपरा
भोकरदन तालुक्यातील भिवपूर, मनापूर, जवखेडा खुर्द व गोकुळ ही गावे राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामपंचायती गेल्या काही वर्षापासून बिनविरोध होत आल्या आहेत. यातील जवखेडा खुर्द हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे गाव आहे. ही ग्रामपंचायत ३० वर्षांपासून बिनविरोध होत आली आहे, तर मनापूर या गावात माजी सभापती लक्ष्मण दळवी यांच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींसह भिवपूर आणि मनापूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत होणारा खर्च टाळून तोच पैसा गावच्या विकासासाठी खर्च करण्याची तयारी सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दाखवली आहे. यामुळे काहींनी या बाजुला दुजोरा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...