आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:टेंभुर्णीमध्ये 16 घरांवर बुलडोझर‎

टेंभुर्णी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे‎ गायरान जमिनीवर अतिक्रमण करून‎ बांधण्यात आलेल्या १६ घरांवर‎ शनिवारी बुलडोझर फिरवण्यात‎ आला. जवळपास ५० वर्षांपासून ही‎ घरे बांधण्यात आली होती, शिवाय‎ येथे नागरिक राहतही होते.‎ टेंभुर्णी येथील गायरान व‎ गावठाणामध्ये ८३० ग्रामस्थांनी‎ अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात‎ आली होती. त्या अनुषंगाने शनिवारी‎ महसूल विभागाने कारवाई केली.‎ दरम्यान, निवासी घरे नियमानुकूल‎ करण्यासाठी ८३० पैकी ७४६‎ ग्रामस्थांनी न्यायालयात धाव‎ घेतल्याने या घरांना तात्पुरती स्थगिती‎ देण्यात आली.

दरम्यान, ज्या‎ ग्रामस्थांनी न्यायालयात दाद मागितली‎ नव्हती, त्या १६ जणांची घरे पाडण्यात‎ आली. याप्रसंगी उपविभागीय‎ अधिकारी अतुल सोरमारे,‎ तहसीलदार स्वरूप कंकाल, पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपविभागीय अधिकारी इंदलसिंग‎ बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र‎ ठाकरे, ग्रामविकास अधिकारी‎ जगदीश आढाव, तलाठी राम धनेश‎ यांच्यासह प्रशासनाचा मोठा ताफा‎ कारवाईसाठी सकाळीच दाखल‎ झाला होता.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ही अतिक्रमणे पाडण्यात आल्यानंतर‎ त्या ठिकाणी शासकीय जागा म्हणून‎ फलक लावण्यात आले. दरम्यान,‎ महसुलांतर्गत येणाऱ्या ८४ निवासी‎ घरांपैकी ६८ ग्रामस्थांनी स्टे मिळाला‎ असल्याने त्यावर शनिवारी कारवाई‎ करण्यात आली नाही.‎

नियमानुकूल करण्यासाठी अनेक जण कोर्टात‎
टेंभुर्णी येथील गट क्रमांक एकसह विविध भागांमध्ये वाढीव गावठाणअंतर्गत‎ ५१७ ग्रामस्थ मागील ५० ते ६० वर्षांपासून निवासी घरे बांधून राहत आहेत.‎ परंतु त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटीस आल्यापासून अनेकांची‎ धाकधूक वाढली होती. दरम्यान, शासकीय नियमानुसार घरे नियमानुकूल‎ करण्यासाठी अनेकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...