आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:मंठा पोलिस ठाण्यात आयोजित शिबिरात 18 दात्यांचे रक्तदान

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाणे, जालना ब्लड सेंटर कंपोनंट अँड अफेरेसिस सेंटर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात अठरा दात्यांनी रक्तदान केले. जातीय सलोखा अभियानांतर्गत येथील पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिस कर्मचारी, शहरातील नागरिक आणि खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक संजय देशमुख, ब्लड बँकेचे लक्ष्मण दराडे, कृष्णा सांगळे, अशोक सांगळे, अक्षय बडे, पूजा निर्वळ, शिल्पा घोडके यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक आडे, विजय जुंबडे, पांडुरंग हगवणे, मांगीलाल राठोड, विजय तांगडे, शहरातील खेळाडू इम्रान पठाण, जुनेद पठाण, शेख रियाज, इमरान बागवान, अमोल शहाणे, अमोल दांडेकर, गणेश सवणे, पवन तळणीकर आदींनी शिबिरात सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...