आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक दुर्बल घटक:गतवर्षी 125 विद्यार्थ्यांना 18 लाखांची शिष्यवृत्ती प्रदान : प्रा. सुरेश लाहोटी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी विज्ञान, एमबीबीएस, इंजीनियरिंग, सीए फाउंडेशन, सीए आयपीसीसी, बी. फार्मसी, पॉलिटेक्निक, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी २०२२ प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या होतकरू आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी यांनी केले आहे.

विद्यार्थ्याच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजाराच्या आत असावे, त्याचे दहावी किंवा बारावी शिक्षण जालना जिल्ह्यातच झालेले असावे, उच्च पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाच शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. गतवर्षी १२५ विद्यार्थ्यांना १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती. यावर्षी त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. या योजनेसाठीची सविस्तर माहिती आणि अर्ज जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या मंठा रोडवरील महेश भवन समोरील कार्यालयात उपलब्ध आहेत तसेच संकेतस्थळ http://www.jefjalna.com/downloads.php वर उपलब्ध असून तेथूनही अर्ज डाउनलोड करून ते भरून २० सप्टेंबरपर्यंत कार्यालयात सादर करावेत.

बातम्या आणखी आहेत...