आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:गणेश विसर्जनासाठी पालिकेचे 2 कृत्रिम तलाव

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने मोती तलावालगतच्या मोकळ्या जागेत दोन कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. सर्व घरगुती गणेशमूर्ती याठिकाणी विसर्जित करण्यात येणार आहेत. यासोबतच निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार असल्याने स्वच्छता मोहिमेलाही पाठबळ मिळणार आहे.

सामाजिक एकता वृद्धिंगत होण्यासाठी सुरू असलेल्या गणेशोत्सवात नगरपालिकेकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. स्वच्छतेची चळवळ गतिमान करावी, यासाठी मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे विविध गणेश मंडळांना भेटी देऊन उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अनोखा गणेश मंडळातर्फे प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीची शुक्रवारी मुख्याधिकारी खांडेकर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली.

मंडळातर्फे केलेल्या सत्कारास उत्तर देताना त्यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उद्योजक अनिल गोयल, योगेश मानधना, संजय भरतीया, ॲड. राहुल हिवराळे, अनोखाचे संस्थापक जगदीश भरतीया, अध्यक्ष जगदीश मुंदडा, संजय अग्रवाल, सचिव गौरीशंकर देवीदान, सुदर्शन मुंदडा, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दायमा, रोहित भुरेवाल, राजेश अग्रवाल, दीपक गिल्डा, गणेश भुरेवाल, सचिन पाटणी, हर्षद चोरडिया यांची उपस्थिती होती.

प्रदूषणविरहित विसर्जनासाठी हातभार लावा
गणेश मंडळांनी परिसर स्वच्छ ठेवत निर्माल्य संकलित करून घंटागाडीत टाकावे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोती तलावाकाठी २ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. गणेश मंडळांसह घरगुती गणपती याठिकाणी विसर्जीत करावे. तसेच मोठ्या मूर्तींसाठी तलावाच्या उत्तरेला सोय करण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिकेटसही लावले जाणार आहे. प्रदूषणविरहित शहर करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...