आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरण निकाली:कोर्टात साडेतीन वर्षांत 2 हजार प्रकरणे निकाली

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा कौटुंबिक न्यायालय महाराष्ट्रच्या पालक न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते रविवारी जालना शहरातील कचेरी रोडवरील जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतरित कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, जालन्यात २३ मार्च २०१९ पासून सुरू असलेल्या कौटुंबिक न्यायालयाकडून आतापर्यंत २ हजार प्रकरणे निकाली निघाली असून आणखी ८०० प्रकरणे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालन्याचे प्रमुखजिल्हा व सत्र न्यायाधीश नारायण गोविंदराव गिमेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात पालक न्यायमूर्ती श्रीकांत द. कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सतीश पाटील यांच्यासह जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. एम. गव्हाणे, ॲड. डी. पी. पाटील, ॲड. सतीश तवरावाला, ॲड. जगदीश बडवे, ॲड. एम. जी. सोनुने, ॲड. एस. व्ही. देशमुख, ॲड. गजानन मांटे, ॲड. जे. एस. भुतेकर, ॲड. महेश धन्नावत, ॲड. प्रदीप बनसोडे, ॲड. घुले, ॲड. वसीम शेख, ॲड. अनिल देशपांडे, ॲड. साखरे, ॲड. एस. के. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...