आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:2 हजार किलो पेढे, 50 हजार मोदक; 500 क्विंटल गुलाल विक्री

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या सावटात सापडलेली बाजारपेठ यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवात चांगलीच फुलून गेली होती. संकटमोचक बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण पाहावयास मिळाले. यात अग्रस्थानी राहिली प्रसाद व खाद्यपदार्थांची विक्री. शहरासह जिल्हाभरात गत १० दिवसांत २ हजार किलो पेढे, ५० हजार लाडू व मोदक विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. यासोबतच ८० हून अधिक डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या भक्तांनी तब्बल ५०० क्विंटल गुलालाची उधळण करत धमाल केली.

यंदा राज्य सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्यामुळे गणेशभक्तांत मोठा उत्साह पाहवयास मिळाला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ३१ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यापासून ते ९ सप्टेंबर अनंत चतुर्दशीला विसर्जनापर्यंत सर्वत्र भक्तिमय वातावरण होते. पहाटेच्या आरतीपासून ते रात्रीच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली. यात केंद्रबिंदू राहिला तो बाप्पाचा प्रसाद. अर्थातच बाप्पाचे आवडते खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदक अन् पेढ्यांना भक्तांकडून प्रचंड मागणी राहिली. विविध नामांकित दुकानांत पेढे, लाडू व मोदकासह इतर खाद्यपदार्थ खरेदीसाठी गर्दी दिसून आली, महालक्ष्मी पूजन व विर्सनादरम्यान यात आणखी वाढ झाली होती. त्यामुळे यातून १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. अनेकांनी घरगुती मोदक, मिठाईला सुद्धा पसंती दिल्याचे प्रिया जोशी यांनी सांगितले. यंदा घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी बसवलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी सहकुटुंब-मित्रपरिवारासह भक्त दिसून आला. यामुळे मंडळांनीही उत्साहात बाप्पाचा प्रसाद वाटप केला.

जालन्यात १२ मोठे गुलाल विक्रेते
डीजेला गणेश मंडळांकडून पसंती^यंदाच्या गणेशोत्सवात शहर व ग्रामीण भागात सर्वत्र डीजेची धूम राहिली. जिल्ह्यात ८० ते ९० डीजे असून ते सर्वच बुक होते. साधारणत: २० ते २१ हजारांची सुपारी होती. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला .
शंकर तौकी, डीजेचालक, जालना

पेढ्यांना भक्तांकडून प्रचंड मागणी
पेढे विक्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून यंदा विक्रमी विक्री झाली. पेढे बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, यातच गणेशोत्सवात मागणी वाढल्याने उशिरापर्यंत थांबून ऑर्डर पूर्ण केल्या. चव व गुणवत्तेमुळे ग्राहकांची चांगलीच पसंती राहिली.

बातम्या आणखी आहेत...