आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पाणंद रस्ते (गाव ते शेत) योजनेत २०२२-२३ मध्ये मंजूर केलेल्या १५८० पैकी केवळ २१ कामे दीड वर्षात पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या ६५७ कामांना अद्यापही सुरू करण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. बोटावर मोजण्याइतकी जी कामे सुरू अाहेत, तीसुद्धा कासवगतीने होत आहेत. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी ग्रामीण भागाचा पूर्ण ताकदीने विकास करण्याचे सहा महिन्यांपू्र्वी आश्वासन दिले होते, तर मातोश्री पाणंद रस्ते कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे या योजनेची आखणी करणारे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले होते. मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याने यंत्रणा कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात मजूर तर उर्वरित कामे यंत्राच्या साह्याने करावे लागते. यात जॉबकार्डधारक मजुरांना कामावर बोलावणे, मस्टर जनरेट करणे, मजुरांची दैनंदिन हजेरी नोंदवून ती ऑनलाइन अपलोड करणे अशा प्रत्येक कामावर ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, अभियंता, गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असते. यात थेट मजुरांच्या खात्यावर पैसे जातात. सुटसुटीत प्रक्रिया असूनही दप्तर दिरंगाई होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.