आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:रेल्वे, रिफायनरी, बीएसएफसह 11  विभागात यंदा 22  हजार पदे भरणार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी नवीन वर्षात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. देशभरातील विविध विभागांत दोन महिन्यांत २२,६३९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्यात दहावीपासून ते पदवीधर तरुण महिन्याला २० हजारांपासून ते २ लाखांपर्यंत वेतन मिळवू शकेल. त्यासाठी उमेदवारांना भारतीय रेल्वे विभाग, कर्मचारी चयन आयोग, बीएसएफ, सरकारी बँकांसह ११ विभागात अर्ज करता येणार आहे.

यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ९५, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बॅँकेत १००, इंडियन नेव्हीत २७५, केंद्रीय श्रम मंत्रालयात १४२, कर्मचारी चयन आयोगात ४५००, केंद्रीय विद्यालयात १३,४०४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, कागदपत्रांच्या पातळणीनंतर निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती संकेतस्थळाव देण्यात आली आहे.

राजस्थान रिफायनरी : १४२ जागा भरणार
राजस्थानमध्ये तरुणंासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम, रिफायनरी लिमिटेडमध्ये १४२ जागा भरणार असून इच्छुकांनी २६ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत. निवड झालेल्या उमदेवारांना ४० हजारांपासून ते २ लाखांपर्यंत वेतन मिळेल. अधिक माहितीसाठी www.hrrl.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

भारतीय रेल्वे : १७८५ जागा
भारतीय रेल्वेमध्ये १७८५ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. दहावी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी rrccr.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

राष्ट्रीय तांत्रिक अनुसंधान : १८२ जागांची भरती
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीअंतर्गत राष्ट्रीय तकनिकी अनुसंधान संघटनमध्ये १८२ जागा आहेत. २१ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना ५६ हजार, तर तांत्रिक सहायकांना ४४ हजार ९०० रुपयांपर्यंत वेतन मिळेल. उमेदवारांनी ntro.gov.in यावर भेट द्यावी.

बीएसएफ : २५४ जागांची भरती
बीएसएफमध्ये ऑटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, फिटर, वल्केनाइज ऑपरेटर, स्टोअर कीपर पदाच्या २५४ जागा भरणार आहेत. इच्छुकांनी ३ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी www.rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

२२ हजार पदांसाठी पात्रता
एचपीसीएलमध्ये दहावी आणि पदवीधर तरुण अर्ज करु शकतील. नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आयटी, आयटीआय, इंजिनिअर पदवीधारक अर्ज करु शकतील. इंडियन ऑइलमध्ये बारावी उत्तीर्ण ते पदवीधारक अर्ज करु शकतील. बीएसएफमध्ये दहावी उत्तीर्ण, रायफलमॅनसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण, रेल्वेत दहावी ते पदवी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हल्पमेंट बँक ऑफ इंडियासाठी विधी पदवी, इंजिनिअर नौसेनेत दहावी आणि आयटीआय, कर्मचारी चयन आयोगाद्वारे भरणाऱ्या पदांसाठी बारावी, केंद्रिय विद्यालयकरिता पदव्युत्तर पदवी असावी.

बातम्या आणखी आहेत...