आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:घनसावंगीत भरणार 221 कवी, साहित्यिकांचा मेळा, 10 व 11 डिसेंबरला मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन

जालना (महदंबानगरीतून)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी महदंबानगरी येथे १० व ११ डिसेंबर दरम्यान होत आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे. राज्यभरातील प्रसिद्ध २२१ कवी, साहित्यिकांसह १०० मान्यवर, राजकारणातील दिग्गज नेते या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. साहित्यासोबतच शेती विषयावरही संमेलनात विचारमंथन होणार आहे. संमेलनात २७ प्रकाशक हजेरी लावणार आहेत.

संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते, मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार असतील. याशिवाय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे आदींची उपस्थिती राहणार आहे. “मराठवाड्यातील राजकीय चित्र : दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. समारोप सोहळ्याला अध्यक्षस्थानी शेषराव मोहिते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती राहिल.

बातम्या आणखी आहेत...