आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहातून घडलेल्या गुन्ह्यांमुळे अनेकांना कारागृहात जावे लागते. परंतु, या ठिकाणी त्या कैद्यांना सकारात्मक करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह सुधारसेवा विभागाचे ब्रीद आहे. यामुळे बंद्यांकरिता विविध उपक्रम राबवले जातात. ज्या कैद्यांच्या हातात कलागुण आहेत, ज्याची इच्छा आहे अशा कैद्यांना मजुरी देऊन काम करून घेतले जाते. दरम्यान, स्वयंपाक, स्वच्छता अशी विविध कामे बंदी कारागृहात करतात. दरम्यान, जालन्याच्या कारागृहात २२९ बंदी आहेत. यातील २३ बंदी हे विविध कामे करून घरच्यांना चार ते सहा हजार रुपयांची कमाई पाठवत असल्याने एक प्रकारे कुटुंबांचा सांभाळच करीत आहेत.
चोऱ्या, दरोडा, खून, बलात्कार, विनयभंग, लूटमार यासह विविध गुन्ह्यांमुळे अनेक आरोपी कारागृहात शिक्षा भोगत असतात. यामुळे त्याच्या कुटुंबीयांची चांगलीच होरपळ असते. दरम्यान, कारागृहात कैद्यांमध्ये बदल घडवण्यासाठी कारागृहांमध्ये वाचनालय, योगा, प्राणायाम, खेळ, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दिबळ, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेऊन सकारात्मक उपक्रम राबवले जात असल्यामुळे कारागृहांना आता सुधारगृहही म्हणावे लागत आहे. दरम्यान, जालना कारागृहातही हे सर्वच उपक्रम राबवण्यात येत असून अनेक बंदी सुधारत आहेत.
दरम्यान, शिक्षा भोगत असताना अनेक बंदीवांनांना रोजंदारीप्रमाणे काम करण्याचीही संधी कारागृहांकडून देण्यात येत असते. दरम्यान, जालना कारागृहातही अनेक कैदी विविध कामे करीत आहेत. कारागृहातील ही कमाई कुटुंबीयांना पाठवून एक प्रकारे कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. या विविध उपक्रमांमुळे कैद्यांमध्ये सुधार होऊ लागला आहे. कैद्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीही अनेक तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहेत.
कारागृहात कैद्यांना अशी मिळते रोजंदारी
कामाच्या वर्गवारीनुसार जालना शहरातील कारागृहात विविध कामे काम करणाऱ्या कैद्यांना रोजंदारी दिल्या जाते. ४८, ६१, ६७ अशी दैनंदिन रोजंदारीचे वर्ग पडलेले आहेत. यात कामानुसार दैनंदिन रोजंदारी दिली जाते. दरम्यान, कैद्यांना मिळालेल्या रोजंदारीतून विविध प्रकारचे पदार्थही विकत घेऊन खाता येतात.
विविध उपक्रमांनी दिनचर्या
कारागृहातील बंदीवानांची विविध उपक्रमांनी दिनचर्या सुरू केली जाते. योगा, प्राणायाम, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुध्दिबळ, वाचनालय यासह विविध उपक्रमांनी कैद्यांची दिनचर्या सुरू होते. यामुळे कैद्यांच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मकपणे होत आहे, अशी माहिती जेलर गोस्वामी यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.