आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी आणि उर्दू माध्यमाचे शिक्षक:आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून 234 शिक्षकांना मिळणार संधी

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यामध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली असून जालना जिल्हा परिषदेमध्ये येण्यासाठी मराठी माध्यमाच्या २०३ व उर्दू माध्यमाच्या ३१ जागा बदली पोर्टलमध्ये रिक्त दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात येण्याची संधी मिळेल.

प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दोन वर्षांपासून पाठपुरावा करून आंतरजिल्हा बदलीची मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती. ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने बिंदुनामावली अर्थात रोस्टर अपडेट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या २०३ व उर्दू माध्यमाच्या ३१ जागा आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन २०२२ करिता जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शिक्षक रिक्त पदाचा तपशील उर्दू माध्यमाच्या बिंदुनामावलीनुसार खुल्या प्रवर्गातील १८ शिक्षक हे अतिरिक्त अाहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना बदलीने जालना जिल्हा परिषदेमध्ये येता येणार नाही. पती-पती एकत्रीकरण, अपंग, आजारी किंवा वृद्ध माता-पिता सेवेसाठी जालना जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना ही संधी आहे. दरम्यान, बिंदुनामावलीनुसार भजक, भजड व खुला प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्त असल्याने या संवर्गातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जालना जिल्ह्यात येता येणार नाही.

जिल्ह्यात परतण्याची संधी
दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्ह्यात परत येण्याची ही संधी आहे. शिवाय साखळी पद्धतीने अनेक शिक्षकांना या जिल्ह्यात येण्याची ही प्रक्रिया आहे.
-संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना

बातम्या आणखी आहेत...