आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:आकडा टाकून वीजचोरी प्रकरणात कंत्राटदाराला 24 हजारांचा दंड

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील रेल्वेस्थानक भागात रेल्वेची स्वच्छता, रेल्वे डब्यांचे मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल दुरुस्ती होण्याच्या अनुषंगाने ९० कोटींच्या खर्चातून पिटलाइन (प्रायमरी सेंटर) तसेच कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बांधकामे, विद्युत मोटार, मशिनरीसाठी लागणारी वीज वापरण्यासाठी अधिकृत व्यावसायिक मिटर घेणे बंधनकारक आहे. परंतू, गुत्तेदार वीज मिटर न लावताच आकडा टाकून सर्रास वीज चोरी करत असल्याचा प्रकार “दिव्य मराठी’ने १७ नोव्हेंबर रोजी समोर आणला होता. दरम्यान, महावितरणच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन मशिनरींची नोंद घेत २४ हजारांचा दंड आकारला.

पिटलाइनची कामे व बांधकाम होत असताना विजेवर चालणाऱ्या विविध मशिनरी, विद्युत पंपाचा वापर केल्या जात आहे. परंतु, वीज मिटर न घेताच आकडा टाकून विजेचा वापर केल्या जात आहे. याबाबत या दै. दिव्य मराठीने या बाबत वृत्त प्रकाशित होताच सकाळी वीज वितरण कंपनीचे सहा जणांच्या पथकाने येऊन पंचनामा केला आहे. आकड्याच्या विजेवर कोणत्या मिशनरींचा वापर झाला, किती वापर झाला, किती युनिट वीज जळाली याचा पंचनामा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. म्हस्के यांनी वरिष्ठांना दिला होता. यानुसार २४ हजाराचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अभियंता एस. एम. वानखेडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...