आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदन:25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मित मृत्यूची नोंद

भोकरदन (महेश देशपांडे)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथील 25 वर्षीय विवाहिता डॉ प्रांजल द्यानेश्वर कोल्हे यांनी दि 30 रोजी दुपारी दिड वाजे दरम्यान शिवाजी नगर येथील राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, डॉ ज्ञानेश्वर कोल्हे याचे भोकरदन येथे जनाई हॉस्पिटल आहे. त्यांचा नुकताच तीन महिन्यांपूर्वी डॉ प्रांजल यांच्याशी विवाह झाला होता. दि 30 रोजी नेहमी प्रमाणे डॉ ज्ञानेश्वर कोल्हे हे आपल्या हॉस्पिटलमध्ये सकाळ पासून रुग्ण तपासणी करत होते. दरम्यान त्यांना रविवारी दुपारी पत्नीसह बाहेर गावी जायचे असल्याने त्यांनी घरी एकदोन वेळा फोन केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने ते दुपारी दीड वाजे दरम्यान घरी गेले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. प्रांजल यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

आजूबाजूच्या शेजारच्या लोकांनी त्यांना सावरून लगेच त्यांच्या नातेवाईक मंडळींना घटना कळवली. त्यांनी लगेच भोकरदन पोलिसांना कळवले घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. भोकरदन ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. संध्याकाळी बरंजळा साबळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भोकरदन शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉ. द्यानेश्वर कोल्हे यांचे मुळगाव बरंजळा साबळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी शिवाजी विठोबा साबळे यांनी कळवलेल्या माहितीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...