आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:सर्वसाधारण उमेदवारांसाठी 26, महिलांसाठी 28 जागा; जालना नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील नगरपालिका प्रभागांचे आरक्षण शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. नव्या आरक्षण सोडतीनुसार शहरातील एकूण ३१ प्रभागातील ६३ जागांमध्ये ८ जागा अनूसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यात चार जागा अनूसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एक जागा अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी २६ तर महिलांसाठी २८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्राथमिक स्वरूपाचा प्रारूप आराखडा मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविल्यानंतर आज जालना नगरपालिकेने शहरातील पालिका हद्दीतील सीमांकन निश्चित करून त्यावर १७ मार्चपर्यंत नागरिकांच्या सूचना, हरकती, आक्षेप मागवले होते. तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या सहीनिशी हे सीमांकन जाहीर करण्यात आले आहे. या आराखड्यानुसार आता शहरातील प्रभागांची संख्या एकने वाढून ३१ एवढी झाली आहे तर सदस्य संख्या दोनने वाढून ६३ एवढी झाली आहे. जालना शहरातील प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यासाठी आज सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव, आनंद मोहिदे, बत्तीन आदींची उपस्थिती होती. प्रभाग आरक्षणाची सोडत काढताना मागासवर्गीय नागरिकांच्या संख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रभाग क्र. १२ अ हा अनुसूचित जमातीसाठी सोडत निघाली.

परंतु या वॉर्डात अनुसूचित जमातीतील नागरिकांची संख्या ४.३४ टक्के आहे तर प्रभाग २९ मध्ये ६.३६ टक्के असल्याने प्रभाग २९ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला. यावेळी आरक्षणाची सोडत काढताना मुख्याधिकारी खांडेकर यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...