आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:जेईएफ करणार 26 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईएफ (जालना फाउंडेशन एज्युकेशन) सोसायटी सामाजिक संस्थेकडून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही केल्या जाते. अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना चालू वर्षात २६ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती सुरेश लाहोटी, सुनील रायठठ्ठा यांनी दिली.

जेईएफ (जालना फाउंडेशन एज्युकेशन) सोसायटी सामाजिक संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्योजक सुनील रायठठ्ठा, सुरेश लाहोटी यांची उपस्थिती होती. जालना शहरातील आर्थिक दृष्ट्या मागे पडलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी जालना एज्युकेशन फाउंडेशन कडून मोफत कोचिंग ट्युशन क्लासही घेतल्या जातात. यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. गतवर्षी १२५ विद्यार्थ्यांना १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती फाउंडेशन कडून प्रदान करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...