आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना लाभ:पांडेपोखरीच्या आरोग्य शिबिरात 260 रुग्णांनी घेतला लाभ ; वर्धापन दिनानिमित्त शिबिर

आष्टी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ व ओजस हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त सहकार्याने परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथे रविवारी सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २६० रुग्णांनी लाभ घेतला.

विशेष म्हणजे शिबीरात मोफत रक्तदाब,शुगर व ईसीजी तपासणी करण्यात आली. प्रारंभी अतिदक्षता तज्ञ डॉ. क्रांतिसिंह लाखे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नेत्र रोग तज्ञ शिवाजी पोकळे, श्रीष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य डाके, डॉ.विशाखा गवळी, परतूर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संभाजी तिडके, प्रा.पांडूरंग नवल यांची उपस्थिती होती. शिबीर दरम्यान तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया साठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काही रुग्णांची निवड करण्यात आली. शिबीरास सरपंच राजाभाऊ जगताप, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे, डॉ.बरसाले, कृषी सेवा केंद्र असोसिएशन चे अध्यक्ष गंगाधर सोळंके, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष रखमाजी कोल्हे, विष्णू मोरे, विष्णू सोळंके, सतीश जगताप, ज्ञानेश्वर सोळंके, कोंडीबा बरसाले, अंबादास पौळ, मनोज काटे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...