आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्र शिबिर:जाफराबादेत नेत्र तपासणी शिबिराचा 260 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील २६० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी १ सप्टेंबर रोजी शिबिर घेण्यात आले. यामध्ये जाफराबाद ११, जानेफळ १४, माहोरा १७ असे एकूण ४३ विद्यार्थ्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालय जाफराबाद येथे करण्यात आली आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक वाकळे, ग्रामीण रुग्णालय जाफराबाद, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. इम्रान फुराकी सागर दांडगे, मोरे यांची उपस्थिती होती.

ज्या मुलांना तपासणी करून ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे त्यांना चष्मे देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना डोळ्यामध्ये दोष आहे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, येथे रेफर करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित केंद्राचे टेंभुर्णी, अकोला, डोणगाव, व कुंभारझरी, केंद्राची विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्योच आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे साहेब गटसमन्वयक वसंत शेवाळे, समावेशीत विषयतज्ञ एम. एम. ओव्हाळ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...