आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रासह प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध:266 ग्रा.पं.ला मिळणार नवे कारभारी, 18 डिसेंबर रोजी मतदान

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जालना जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी निकाल घोषित होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबत घोषणा केली. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर गावपातळीवरील ही पहिलीच निवडणूक असून यात कोण बाजी मारतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

ग्रामपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणुकांत अंबड तालुक्यातील ४०, घन सावंगी ३४, जाफराबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२ तर मंठा ३५ अशी जिल्ह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीची संख्या आहे. १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र मागवण्याची व सादर करण्याची तारीख व वेळ २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी सुरू होईल ती संपेपर्यंत चालेल. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येतील तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह दिले जाईल.

तसेच अंतिम रित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालेल व २० रोजी मतमोजणी केली जाईल. शेवटी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले.

निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम घोषित, छायाचित्रासह प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादी जिल्ह्यातील ९९-परतूर, १००-घनसावंगी, १०९-जालना, १०२- बदनापूर व १०३-भोकरदन या विधानसभा मतदार संघातील एकूण १ हजार ६५० मतदान केंद्र, पद निर्देशित ठिकाणी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आल्याचेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...