आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आयकॉनिक सप्ताहात जिल्ह्यातील 272 आर्थिकदृष्ट्या दुर्बल; नवउद्योजक अन् महिलांना आठ कोटी रुपयांचे कर्ज केले मंजूर

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक ऑफ महाराष्ट्र (जिल्हा अग्रणी बँक), व्यावसायिक बँक आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आजादी का अमृतमहोत्सवांतर्गत बुधवारी जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात ६ ते १२ जूनदरम्यान आयकॉनिक सप्ताहांतर्गत आयोजित आर्थिक समावेशन शिबिरात बँकांनी आर्थिक दुर्बल घटक, छोटे व्यापारी, नवउद्योजक, महिला अशा २७२ लाभार्थींना ८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली.

या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दिवेश दिनकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, प्रबंधक महेश डांगे, क्षेत्रीय प्रबंधक सूरज यामयार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक सुनील जोशी, आरसेटीचे संचालक मंगेश डामरे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी दिवेश दिनकर यांनी अद्भुत आणि व्यापक आजादी का अमृतमहोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व बँकर्सचे अभिनंदन केले. बँकांची उत्पादने डिजिटल पद्धतीने ऑफर करून देशातील आर्थिक समावेशनातील अंतर भरून काढण्याच्या मोठ्या संधी असल्याचे सांगत जिल्ह्यातील बँका ते भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद झोनचे मॅनेजर महेश डांगे यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात AKAM कार्यक्रम साजरे करण्याचे महत्त्वही विशद केले. तसेच या कार्यक्रमात विविध महिला बचत गट संबंधित योजना, मुद्रा योजना, PMSvanidhi, PMJDY, PMSBY, PMJJBY, APY, स्टँड अप इंडिया, डिजिटल उत्पादने आदींचा प्रचार करून गरीब आणि गरजू लाभार्थींना त्वरित मंजुरी देण्यात आली. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...