आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:सरपंचपदाच्या 55 जागांसाठी 274, तर 274 सदस्यांसाठी 1164 अर्ज

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नोव्हेंबर २०२२ पर्यंत कालावधी संपलेल्या ५५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २७४ तर ४५१ सदस्य पदासाठी तब्बल ११६४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या अर्जाची छाननी पाच डिसेंबर रोजी होत आहे. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक, वरुड खुर्द, माहोरा, खासगाव,चापनेर/धोंडखेडा, कुंभारझरी, पापळ, कुंभारी, हिवराकाबली, सांजोळ सोनगिरी, कोळेगाव, निमखेडा बुर्दुक, हनुमंतखेडा,आढा, आरदखेडा, गोकुळवाडी, गाडेगव्हाण, भारज खुर्द, नळविहरा यासह इतर गावांमध्ये ही ग्रामपंचायत निवडणुक होणार आहे. २ डिसेंबर २०२२ या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती. ११६५ सदस्यपदासाठी तर सरपंच पदासाठी २७४ इच्छुकांनी नामनिर्देशने दाखल केले . ४५१ सदस्य निवडले जाणार असुन २७४ सरपंचाच्या पदांमधुन ५५ जण गावचा कारभार पाहणार आहेत. शेवटच्या दिवशी ऑफलाईन नामांकन दाखल करण्याची व अडीच घंटे वाढवुन देण्यात आल्याची मुभा देण्यात आली होती.

या सर्व नामनिर्देशनपत्राची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार असून ७ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होईल. तर मतमोजणी २० डिसेंबरला होणार असुन मतमोजनी नंतर निवडून आलेल्या उमेदवारांची अधिसुचना २३ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने प्रसिध्द होईल. असे निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले. या ५५ ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन स्विकारण्यासाठी २० टेबल व एका टेबलवर दोन ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन स्विकारण्यासाठी ४० निवडणुक अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली होती. तहसिलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल, पंचायत समिती, कृषी कार्यालय, जि.प.शाळांचे शिक्षक, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत तथा पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी निवडणुक कामी नियोजन करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...