आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅयलर अग्निप्रदीपन:समर्थ कारखान्याच्या गळितासाठी‎ 28243 हजार हेक्टर उसाची नोंद‎

वडीगोद्री‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी‎ साखर कारखान्याचा २०२२-२३ गळीत‎ हंगामासाठी २८२४३ हजार हेक्टर उसाची‎ नोंद झाली असून हेक्टरी ७० मे.टन प्रमाणे‎ १९.७७ लाख मे.टन ऊस गाळपासाठी‎ उपलब्ध होईल. यापैकी कारखान्याचे‎ युनिट नं.१ अंकुशनगरकडे ९ लाख मे.टन‎ व युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरीकडे ६‎ लाख मे.टन असे एकूण १५ लाख मे.टन‎ उसाचे गळीत होईल. दोन्ही युनिटचे ऊस‎ गाळप विचारात घेऊन कार्यक्षेत्रात अंदाजे‎ ४.७७ लाख मे.टन ऊस अतिरिक्त होईल‎ असा अंदाज असल्याचे माजी मंत्री‎ आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केला.‎ समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या‎ बाॅयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते‎ बोलत होते.

या वेळी संचालक मनोज‎ मरकड, सरदारसिंग पवार, सुरेशराव औटे,‎ विकास कव्हळे, किरण तारख, पाराजी‎ सुळे, सदाशिव दुफाके, तीर्थपुरीकडील‎ बाॅयलर अग्निप्रदीपन पूजा कारखान्याचे‎ उपाध्यक्ष उत्तम पवार, संचालक अमरसिंह‎ खरात, बाबासाहेब कोल्हे, कैलास जिगे,‎ त्र्यंबकराव बुलबुले, अशोक आघाव,‎ शेषराव जगताप, दत्तू जाधव, तात्यासाहेब‎ उढाण आदी उपस्थित होते. आ .राजेश‎ टोपे म्हणाले की, कारखान्याच्या दोन्ही‎ युनिटचे रिपेअर व मेंटेनन्सची कामे‎ अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केली. मागच्या‎ हंगामातील अडचणी सोडवण्यासाठी‎ प्रयत्न केले आहेत. कारखान्याच्या दोन्ही‎ युनिटसाठी क्षमतेप्रमाणे उसाचा पुरवठा‎ व्हावा यासाठी सक्षम ऊसतोड व वाहतूक‎ यंत्रणा भरती केली असून त्यांना अॅडव्हान्स‎ वाटप केला. गळीत सुरू करण्याच्या दृष्टीने‎ आवश्यक ती सर्व तयारी कारखान्याने पूर्ण‎ केली आहे.

अाॅक्टोबर २०२२ च्या दुसऱ्या‎ आठवड्यात कारखान्याच्या दोन्ही युनिटचे‎ गाळप सुरू करण्यात येईल. या हंगामात‎ मोबाइल अॅपद्वारे आॅनलाइन ऊस नोंद व‎ तोड कार्यक्रम पारदर्शकपणे राबवला‎ जाणार आहे. शेती विभागाने यांची‎ काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मंत्री ‎ ‎ समितीच्या निर्णयानुसार १५‎ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष गाळपास सुरुवात ‎करण्यात येईल. शेतकरी बांधवांनी‎ सुधारित ऊस जातीच्या उसाची लागवड ‎करावी व एकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कारखान्याचे युनिट नं.१ ची गाळप ‎क्षमता वाढ करणे व १०० केएलपीडी‎ इथेनॉल प्रकल्पांचे काम लवकरच सुरू ‎करण्यात येणार आहे आणि या हंगामाच्या ‎ शेवटी त्यांचे ट्रायल घेण्याचा प्रयत्न‎ करण्यात येणार आहे.‎

समर्थ साखर कारखान्याचा गळीत हंगाम बाॅयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंग माजी‎ मंत्री राजेश टोपे यांच्यासह संचालक मंडळाचे पदाधिकारी.‎ सभासदास १५ रुपये भावाप्रमाणे साखर देणार‎ कारखान्याचे सर्व सभासद, लाभार्थी सभासद व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त‎ खास बाब म्हणून प्रत्येक सभासदास १० किलो साखर १५ रुपये प्रति किलाे या‎ सवलतीच्या दराने वाटप करण्यात येणार आहे. ़साखरेचे वाटप १२ ऑक्टोबरपासून‎ केले जाणार आहे. कारखाना साईट पुर्व-पश्चिम व अंबड विभागांतर्गत येणा-या‎ गावातील सभासदांची साखर युनिट नं.१ अंकुशनगर येथील साखर वाटप केंद्रावर‎ आणि तिर्थपुरी, कुंभार पिंपळगांव, घनसावंगी, राणीउंचेगांव व कारला विभागांतर्गत‎ येणा-या गावातील सभासदांची साखर युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरी येथील साखर‎ वाटप केंद्रावर दिली जाणार आहे. कर्मचा-यांना पगारवाढ दिली असून दिवाळी‎ सणानिमित्त १०% प्रमाणे बोनस देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...