आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:जालना तालुक्यात 29 ग्रा. पं. निवडणुकीसाठी 91 उमेदवार

गिरिराज गिराम|सिंधी काळेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालूक्यातील २९ ग्राम पंचायतच्या निवडणुका होत असल्याने आता भेटीगाठी वर जोर दिला जात आहे. १८ डिसेंबर मतदान असल्याने ग्रामीन भागात वातावरण चांगलेच तापायला सुरूवात झाली आहे. यंदा सरपंच पद हे जनतेतून असल्याने अनेकांनी गुडघ्याला बांशिंग बांधले आहे.

या मध्ये ग्राम पंचायत ताब्यात घेण्यासाठी युवा वर्ग मोठ्या प्रमानात सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात अनेक तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. २९ ग्राम पंचायतीच्या सरपंचासाठी ९१ उमेदवार उभे राहील्या असल्याने ग्रामीन भागात प्रतिष्ठेच्या लढाईसाठी मोठी चूरस निर्मान झाली आहे. त्यात नेर येथील सरपंच पदासाठी उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांने चक्क १०० रुपयांच्या बॉन्ड पेपर वर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

ग्राम पंचायत निवडनूक हि राजकिय चिन्हावर लढवत नसले तरी या निवडनूकीला मोठे महत्व असते. फेसबूक, व्हाट्सएप वर मोठ्या प्रमानात भर आहे. असे असताना जालना तालूक्यातील नेर येथील ग्राम पंचायतच्या निवडनूकित अपक्ष निवडनूक लढणाऱ्या वटेश्वर भगवान परिवर्तन ग्रामविकास पॅनल च्या वतीने चक्क १०० रुपयांच्या बॉन्डपेपर वर जाहीरनामा करण्यात आला. या मध्ये सरपंच म्हनून निवडून आल्यास ९० दिवसाच्या आत गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यात येईल नसता मी स्वखुशीने राजीनामा देईल. अशा प्रकारे १७ मुद्दे या मध्ये देण्यात आले आहे. रामनगर, नेरसारख्या ग्रामपंचायती मोठ्या असल्याने या ठिकाणीही चांगलीच चुरस निर्माण पाहायला मिळत आहे.

जालना तालुक्यात सदस्यांच्या २४५ जागांसाठी ४९९ उमेदवार
जालना तालुक्यातील २९ ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी निवडनूका होत आहे. ७ तारखेला अर्ज मागे घेल्यानतंर २९ ग्राम पंचायतच्या सरपंच पदासाठी ९१ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्याच्या २४५ जागासाठी ४९९ उमेदवार उभे राहीले आहेत. अनेक गावात दोन तर काही ठीकानी तीन पँनल उभे राहील्याने मोठी चूरस निर्माण झाली आहे. यासाठी १८ डिसेबरला मतदान होत असून ग्रामस्थ गावाचा कारभारी कुणाला निवडतात हे २० डिसेंबर रोजी मतमोजनी नतंर स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...