आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:एकाची 29 हजार रुपयांची फसवणूक

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्यासाठी नंबर द्या, असे म्हणून एकाची २८ हजार ८२६ रुपयांची फसवणूक केल्याची घटना जालना शहरातील हनुमान घाट येथे ७ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी रमेश भीमराव चोपडे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश चोपडे हे शहरातील मुंडे चौकात बसले होते. तेव्हाच त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्यासाठी कार्डचा नंबर मागितला. त्यानंतर ओटीपी पाठवून चोपडे यांच्या खात्यातून २८ हजार ८२६ रुपये काढून घेतले. पुढील तपास पोलिस करीत आहेत. नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...