आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेतून मतदान:जालना तालुक्यातील 29 ग्रा. पं. निवडणुका

गिरीराज गिराम | सिंधी काळेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील कालावधी संपलेल्या २९ ग्राम पंचायतच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सरपंचपद यंदा थेट जनतेच्या दरबारातून असल्याने गावातील अनेक जेष्ठ नागरिक, युवक हे सरपंच पदासाठी नशीब आजमावणार आहे.

२८ नोव्हेबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरूवात होणार असली, तरी आता प्रत्येक गावात राजकिय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. ५ डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी ७ ला अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे.

१८ रोजी मतदान आणि २० ला मतमोजनी होणार आहे. तालूक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत नेर आणि रामनगर या दोन मोठ्या ग्राम पंचायती आहे. या दोन्ही ठिकाणी आठवडी बाजार असतो तसेच परिसरातील २० ते २५ खेड्याचा या गावाशी कनेक्टिव्ही आहे. त्यामुळे ह्या ग्राम पंचायत कडे सर्वाचे लक्ष असणार आहे. जालना तालूक्यातील २९ ग्राम पंचायच्या कालावधी त्या ठिकाणी निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहे. पुर्वीच्या काळी पेक्षा आता ग्राम पंचायतला मोठ्या प्रमाणात निधी मिळू लागला आहे. १५ व्या वित्तआयोग, जिल्हा परीषद पंचायत समीतीसारख्या मिनी मंत्रालयातून सुद्धा मोठ्या प्रमाणात गावाच्या विकासासाठी निधी मिळत असतो.

तसेच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्यासाठी केद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत लाखो रूपयाचे निधी ग्राम पंचायतला मिळत असतो. त्यामुळे ग्रामीन भागात सरपंच पदाला मोठे महत्व आले आहे. त्यामध्ये राज्य सरकारने सरपंच पद थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतल्याने गावातील सामाजिक , राजकिय पक्षाचे युवा कार्यकर्ते थेट सरपंच पदाची स्वप्न पहात आहे. आता प्रत्येक गावात पँनल तयार करणे, अर्ज भरण्यासाठी लागणारे पुरावे जमवा-जमवी करण्याचे काम सूरू आहे.तालुक्यात होऊ घातलेल्या २९ ग्राम पंचायत मध्ये नेर ग्राम पंचायत सर्वात मोठी आहे.

नेर या ठिकाणी मोठी बाजार पेठ आहे. दर बुधवारी या ठिकाण बाजार भरतो. परीसरातील २० ते २५ गावाचा या बाजाराचा संबंध असतो. आरोग्य सेवे साठी या ग्रामीन रूग्णालय आहे. त्यामुळे ग्राम पंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करीत आहे. यामध्ये तरूणांमध्येही मोठा उत्साह दिसुन येत आहे.

या गावांत रणधुमाळी सुरू
जालना तालूक्यातील अहंकार देऊळगाव, एरंडवडगाव, कुंबेफळ सिंदखेड, खाबेवाडी-नागापूर, गवळीपोखरी, टाकरवन, ढगी, धावेडी-थार, नेर, नंदापूर, पाहेगाव, पानशेंद्रा, पाष्टा, पिरपिंपळगाव-तातेवाडी-भातखेडा, पोखरी सिंदखेड, मजरवाडी, मानेगांव खालसा, मोहाडी मोतीगव्हाण, राममूर्ती, रामनगर, वरखेड सिंदखेड, सावरगाव हडप-हडप, साळेगाव जालना, साळगांव नेर, सोलगव्हाण-कवठा, माळी पिंपळगाव, सावरगाव भागडे-बिबी, सारवाडी, नेर - शेवगा गावाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...