आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:परतूरमध्ये निवडणुकीबाबत दुसरे प्रशिक्षण

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार रूपा चित्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, प्रशिक्षणाला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तहसील कार्यालयात निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी या व इतर अनेक कर्मचाऱ्यांची या कामी नेमणूक करण्यात आली आहे.

तालुक्यातील आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात सोमवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र कसे हाताळावे, सील कसे करावे, विविध प्रकारची कागदपत्रे कशी भरावीत या व इतर अनेक महत्वाच्या बाबींसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार धुमाळ, पेशकार संतोष पवार, अशोक ससाणे, कल्याण बागल, राजेंद्र हेलगड, कृष्णा सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...