आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक वितरण:शेतकऱ्याचा बीज प्रक्रिया स्पर्धेत दुसरा क्रमांक

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवळा येथील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेत जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना राहुरी येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय केमिकल्स अँड फार्टीलायझर्स लि. मुबंई, तिफण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्त राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

कृषी सहाय्यक अधिकारी महाराष्ट्र व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्येमाने खरीप हंगाम ऑनलाईन राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धा २०२२ घेण्यात आली होती. अंबाजोगाई तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी रविंद्र भानुदास देवरवाडे यांनी जिल्हातून दुसरा क्रमांक पटकावला.त्यांना जिल्हास्तर द्वितीय पुरस्कार देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...