आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष पश्चिम लिंबाजी वाहुळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मिळणारे १ लाख ३८ हजाराचे अनुदान अत्यंत तुटपुंजे असून त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागासाठी या अनुदानात वाढ करुन २ लाख ५० हजार रुपये तर शहरी भागासाठी ३ लाख रुपये अनुदान द्यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी मिळणाऱ्या विहिरींना काही गावात भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी असल्याचे कारण पुढे करुन आडकाठी करण्यात येते. त्यामुळे मागासवर्गीयांच्या बागयतदार होण्याच्या स्वप्नाला तिलांजली देण्याचे काम हा विभाग करीत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी. गायरान जमिनी कसरणाऱ्या कास्तकऱ्यांच्या नावे सातबारा देण्यात याव्यात. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची जाचक अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. अंबड तालुक्यामध्ये पानेगाव ते वाघलखेडा नकाशाप्रमाणे ३३ फूटाचा रस्ता मोकळा करण्यात यावा. परतूर तालुक्यातील आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक सभागृहासाठी जागेचा नमुना नंबर ८ देण्यात यावा.
जिल्ह्यातील जुगार, मटका, दारू, रेती अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे. नंदापूर फाटा ते नंदापूर गावात तसेच अहंकर देऊळगाव ते माळाचा गणपती नवीन रस्ता तात्काळ बनविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला. या वेळी चंद्रकांत खरात, मच्छिंद्र खरात, गोपाळ खरात, सुरेश खरात, सर्जेराव अंभोरे, ज्ञानदेव खरात, दादु गरबडे, जालिंदर सोलाट, अॅड. अशोक वाहुळकर, अॅड. मदन पंडित, अॅड. संदेश तुपे, सुरेश वानखेडे, अरुण म्हस्के, दादाराव काकडे, शुभम हिवराळे, भीमराज खरात, सचिन खरात, नवनाथ ठोके, भगवान वाहुळकर, सिध्दार्थ पानवाले, मधुकर म्हस्के, कैलास उघडे, जयपाल भालके, गोरख आपुट, गौतम पानवाले, कांताबाई बोरुडे, मथुराबाई मोरे, शोभाबाई म्हस्के, सुमनबाई खरात, सुरेखाबाई तेजाळ, शांताबाई हिवाळे, इंदुबाई लहाणे, मिनाबाई खरात, अमोल खरात, डॉ. प्रिया जैन, किशोर साळवे, कुंडलिक वाहूळकर, गिरधारी गवई, शेख जब्बर, भदर्गे, संतोष हिवराळे, रमेश आदमाने, प्रविण सुर्यनारायण, सचिन वाहुळकर, गणेश आदमाने, विलास काजळकर, रामनाथ काजळकर, ज्ञानदेव खरात, भाऊराव कोळे, कैलास भालके, नितिन भादरगे, किशोर साळवे, काशिनाथ वाघमारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.