आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणारे मोकाट श्वान वाहनांवर झेपावतात. जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या पाठीमागे लागतात. शहरात दररोज ६ ते ११ जणांना चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत.
पालिकेकडून दरवर्षी निर्बीजीकरणासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते, परंतु सात वर्षांनंतर एकदाही निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही. शहरात उघड्यावरच मटनांची दुकाने व मोकळ्या जागेतच विष्टा पडत असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
चार लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ हजार मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील तीन वर्षांत ५ हजार ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. कुत्र्यांचा हा विषय नगरपालिकेच्या सभेत वारंवार चर्चिला गेला, परंतु प्रत्यक्षात मोकाट श्वानांबाबत बंदोबस्ताचा विषय आजही मार्गी लागलेला नाही.
मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश भागात मोकाट कुत्र्यांचे जत्थेच जत्थे फिरत असतात. हे कुत्रे अचानक हल्ले करुन महिलांसह, अाबालवृध्द, लहान मुले जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु यावर कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येत नाही. रुग्णालयात रोज ४० ते ६० रुग्णांवर होताहेत उपचार जिल्हा रुग्णालयातील रेबीज विभागात लहान मुले, ज्येष्ठ, महिला, पुरुष अशांवर रोज ४० ते ६० जणांवर उपचार करावे लागते.
पिसाळलेला कुत्रा, चांगला कुत्रा, जखम किती आहे, यानुसार इंजेक्शन डोस यावर दररोज ४० ते ६० जणांवर उपचार करावे लागतात. कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. याकडे पालिकेने लक्ष देणे गरजचे आहे.
कुत्र्यांच्या बंदाेबस्तासाठी निर्बिजिकरण हा एकमेव उपाय आहे का ?
निर्बीजीकरण उपाय नाही, परंतू संख्या कमी होईल. निर्बीजीकरण करणे एकमेव उपाय नाही. परंतू, मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत. आता जशी कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढतेय ते प्रमाण कमी होईल.
निर्बीजीकरणासाठी यंदा तरतूद किती केली आहे?
निर्बीजीकरणासाठी चालू वर्षात १० लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. निर्बिजीकरण कोण करणार व कधी करणार ? निर्बीजीकरण करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. येणार्या चार महिन्यांत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. वरिष्ठ पातळीवरील पत्रव्यवहार, कोरोना व अधिकारी बदलत राहील्याने प्रक्रियेत हे लांबणीवर पडले आहे.
वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष मोकाट कुत्र्यांचा कांचननगर, शिवनगर, नूतन वसाहत या भागांत चांगलाच हैदोस आहे. उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे ही संख्या वाढत आहे. कॉलनीत अनेकदा लहान मुलांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहे. आता लवकरच आंदोलन करणार आहोत.
- शशिकांत घुगे, माजी नगरसेवक
निर्बीजीकरण होत नसल्याने संख्या वाढली शहरात उघड्यावर मटन विक्रेत्यांच्या दुकानांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. निर्बीजीकरण होत नसल्यामुळे ही संख्या वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घ्यायला हवे.
- ओमप्रकाश चितळकर, प्रदेश सचिव, राष्ट्रीय समाज पक्ष
निर्बीजीकरण होत नसल्याने संख्या वाढली शहरात उघड्यावर मटन विक्रेत्यांच्या दुकानांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. निर्बीजीकरण होत नसल्यामुळे ही संख्या वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घ्यायला हवे.
- ओमप्रकाश चितळकर, प्रदेश सचिव, राष्ट्रीय समाज पक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.