आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:30 खेळाडू करणार जिल्ह्याचे नेतृत्व ; संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धा

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग नोंदवला. यातील विजयी ३० खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. लक्ष्मण उढाण यांच्या हस्ते झाले. या वेळी तायक्वांदो असोसिएशन जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, जगन्नाथ काकडे पाटील, प्रा. विजय कमळे, सचिन आर्य आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...