आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन- राजूर या मंजूर झालेल्या या राष्ट्रीय महामार्गात भोकरदन शहरातील सुमारे ३०० च्या जवळपास अतिक्रमण धारकांची अतिक्रमण राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता उप अभियंता व महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यासह विशेष पथकाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात काढली आहेत. भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुंभारी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मध्य रेषेपासून ५० फुटापर्यंत आत मध्ये येणारी सर्व अतिक्रमणे काढून टाकल्याने हा महामार्ग मोकळा झालेला आहे. सकाळी दहा वाजता सुरू झाली बुलडोझर जेसीबी व मलबे वाहून नेण्यासाठी हायवा ट्रॅक्टर आधी २५ ते ३० वाहनासह पार काम करणारे कर्मचारी यांच्या पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली.
या कारवाई दरम्यान ज्यांनी स्वतःहून काढलेली अतिक्रमणे वगळता राहिलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. विशेष म्हणजे भोकरदन जालना रोडवर महामार्गाच्या हद्दीमध्ये आलेले जिल्हा परिषद प्रशाला नवे भोकरदनचे षटकोनी खोली व स्वयंपाक गृह ही पाडण्यात आले. त्याचप्रमाणे बाजूला असलेल्या न्यायाधीशांच्या व पोलीस निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाचे सुरक्षा भिंती, काढण्यात आल्या आहे. अतिक्रमण काढतेवेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यासह उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, पोलीस उपविभागीय अधिकारी इंदल सिंग बहुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोठ्या पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमणे काढण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.