आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:319 मुख्याध्यापकांना शिक्षण व्यवस्थापनाचे धडे‎

जालना‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्ययन तसेच अध्यापन कौशल्य, वर्गाचे‎ निरीक्षण, अहवाल लेखन, कर्तव्य,‎ जबाबदाऱ्या तसेच शासनाच्या विविध‎ योजना, अध्ययन साहित्याचा वापर अशा‎ प्रकारच्या १५ महत्त्वाच्या बाबींचे‎ मुख्याध्यापकांना प्रोफेशनल लर्निंग‎ कम्युनिटीचे प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात‎ आले. याची कृतियुक्त उजळणी गुरुवारी‎ डायटच्या वतीने एका कार्यशाळेतून‎ घेण्यात आली. यासाठी ३१९‎ मुख्याध्यापकांनी नोंदणी केली हाेती.‎ जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच‎ खासगी शाळांसाठी मुख्याध्यापक म्हणुन‎ नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या‎ पदाचा कार्यभार सांभाळताना कोणत्या‎ बाबींचे ज्ञान, प्रशिक्षण असावे यासाठी‎ शासनाकडून मुख्याध्यापक सक्षमीकरण हा‎ प्रोग्राम तयार करण्यात आला.

याचे तीन‎ टप्पे करून ऑनलाइनच्या माध्यमातून‎ मुख्याध्यापकांना हे प्रशिक्षण देण्यात आले.‎ याचा एक टप्पा म्हणून उजळणी तसेच‎ तांत्रिक बाबींची कृती करण्यासाठी‎ जालन्यात डायटच्या वतीने बुधवारी‎ सकाळी १० ते ५ या वेळेत प्रशिक्षण घेतले.‎ गुरुवारी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात याचा‎ नियमित पाठपुरावासुद्धा डायटच्या‎ माध्यमातून घेतला जाणार आहे.‎ मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण‎ पी.एल.सी. जिल्हा समन्वयक सय्यद‎ अख्तर,तालुका समन्वयक डॉ. करुणा‎ हिवाळे, बालाजी मदन, डॉ. स्मिता रोडगे,‎ विद्या पतंगे, दिलीप चव्हाण,संदीप‎ देशमुख, सतीश मेहेत्रे, आदींच्या यांच्या‎ नियोजनातून पार पडले.‎

प्रशिक्षण पूर्ण‎ केलेल्यांचीच उजळणी
‎ज्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन‎ प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केलेले आहेत,‎ त्यांच्यासाठी उजळणी तसेच काही‎ बाबींच्या कृती समजावून‎ सांगण्यासाठी ही कार्यशाळा‎ जालन्यात घेण्यात आली.‎ शाळेसाठी सक्षम मुख्याध्यापक ही‎ यामागील संकल्पना आहे. प्रशिक्षण,‎ कार्यशाळेतून त्यांना १५ घटकांवर‎ प्रशिक्षित करण्यात येत आहे.‎ - डॉ. आर. डी. कांबळे, प्राचार्य,‎ डायट, जालना‎

बातम्या आणखी आहेत...